लाच मागितल्याप्रकरणी सहायक वस्त्रोद्योग आयुक्तांना अटक

ACB-nagpur

नागपूर (प्रतिनिधी) – सुरक्षा एजन्सीचे थकीत साडे नऊ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी वस्त्रोद्योग कार्यालयातील सहायक आयुक्त योगेश बाकरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. योगेश बाकरे, असे अटक करण्यात आलेल्या सहायक आयुक्तांचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदार हे सुरक्षा रक्षक एजन्सीचे संचालक आहेत. एजन्सीच्या थकीत साडे नऊ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी सहायक आयुक्त योगेश बाकरे यांनी तीन लाख रुपयांचा लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारादाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने योगेश बाकरे यांना अटक केली. अटक केल्यावर न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने बाकरे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक आयुक्त योगेश बाकरे यांनी स्वीय सहायक नितीन वर्मा यांना अटक केली होती. नितीन वर्मा यांनीच तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. सहायक आयुक्त योगेश बाकरे यांच्या सांगण्यावरून मागणी केल्याची कबुली वर्माने दिली होती. त्यानंतर सहायक आयुक्तांना अटक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here