सिंदी रेल्वे (प्रतिनिधी) – सिंदी रेल्वे नगरीतील गांधी चौकात ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहन च्या मुख्य कार्यक्रमात केसरीमल नगर विद्यालय सिंदी रेल्वे येथील उपक्रमप्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे यांचा शहर काँग्रेस कमिटी व सिंदी पत्रकार संघातर्फे नागरी सत्कार करण्यात आला.
मागील ३० वर्षा पासून शालेय कलाशिक्षण क्षेत्रात शाळेच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कला परीक्षा विविध उपक्रम, विविध चित्रकला स्पर्धा राबविण्यात येत आहे. त्यामधून विद्यार्थ्यानी आपले (नाव, शाळेचे नाव तसेच सिंदीनगराचेनाव हे गावं, तालुका, जिल्हा,राज्य , तसेच अखिल भारतीय स्तरावर (भारतातून) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावण्याचा बहुमान एक नाहीतर दोन वेळा भारतातून १)रजत वानखेडे (सन- २०१६ )तर २)कु. मोनिका राजेश गिरजापूरे हिला (सन- २०१८) नवनीत पब्लिकेशन्स प्रा.लि. व्दारा आयोजित अखिल भारतीय स्तरावर “पेन्ट – ओ – फन ” स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावर (भारतातून) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (लॅपटॉप) प्राप्त करून शाळेचे व गावाचे नाव देशपातळीवर गाजविले.

कोराना -१९ लॉकडाऊन मुळे (शाळा/कॉलेज /कार्यालय) संपूर्ण भारतात बंद असल्याने, विविध स्पर्धा ह्या ऑनलाईन घेण्यात आल्या. सरकारने शैक्षणिक धोरणाची घोषणा केली. नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ” हे गावं,तालुका, जिल्हा, राज्य तसेच देश पातळीवर लोकांना जनजागृती व्हावी या उद्देशाने विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान दिल्लीच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर विविध स्पर्धा (विद्यार्थ्यांसाठी , महाविद्यालय साठी चित्रकला व निबंब स्पर्धा व पालक-शिक्षका व इतरसाठी पोस्टर स्पर्धा, तसेच मिक मेकिंग स्पर्धा ) ईत्यादी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. त्यात उपक्रमप्रिय कलाशिक्षक उत्तम वानखेडे यांनी आदिवासी चित्र शैली मधील (वारली चित्रकला) मध्ये पोस्टर स्पर्धेत सहभागी होऊन अखिल भारतीय स्तरावर (भारतातून) प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (रोख दहा हजार रुपये) प्राप्त करून शाळेचे नाव,हिंदी नगरीचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा गाजविले.
त्यामुळे सिंदी नगरीतील गांधी चौकात ७२ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहन समारंभात कॉंग्रेस कमिटीच्या वतीने व सिंदी पत्रकार संघातर्फे उपक्रम प्रिय/ कलाध्याक उत्तम वानखेडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाशचंद्रजी डफ (सिंदी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष) , प्रमुख पाहुणे छत्रपती पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉ.सुरेशराव बोंगाडे,नगर पालिका अध्यक्षां सौ.सुनिता शेंडे,माजी अध्यक्षा सौ कलोडे , नगरसेवक व नगर सेविका, पत्रकार मोहन सुरकार, नरेन्द्रराव सुरकार, ओमजी राठी, प्रंशात कलोडे, प्रशांत बोरीकर, अमोल सोनटक्के, दिनेश घोडमारे , विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष, संघटनेचे नेते.विविध शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक- शिक्षिका, व्यापारी मंडळ व पालक कार्यक्रम सूत्रसंचालन इकबाल भैय्याजी आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यामुळे उपक्रम प्रिय कलाध्यापक उत्तम वानखेडे यांना सर्व मान्यवर, उपस्थित पालक,नागरीक, व्यापारी मंडळ, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षिका व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते , कर्मचारी कडून शुभेच्छा देण्यात आल्या.




