मध्यरात्री घरात घुसून जावयाने केला सासूचा विनयभंग

mother-in-law-vinaybhag

सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – पत्नीच्या माहेरी जाऊन सासूस मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी मिरजेतील एकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिरजेतील एका इसमाने गुरुवार दि. 28 रोजी मध्यरात्री जबरदस्तीने पत्नीच्या घरात घुसून सासूला ‘माझी बायको कोठे आहे सांगा, तिने माझ्यावर गुन्हा का दाखल केला आहे’ असे जोरजोरात ओरडून मारहाण करीत त्यांचा विनयभंग केला.

त्यावेळी त्यांचा मुलगा भांडण सोडविण्यासाठी आला असता जावई त्यांच्या अंगावर चाकू घेऊन धावून गेला. त्याने मेव्हुण्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here