सातपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकास अटक

rape-on-minor-in-satpur

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – सातपूरमध्ये एकाने (वय ५७) आपल्या घरात कोणीही नसल्याची संधी साधत घराशेजारीच राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक झाली असून न्यायालयाने त्याला २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या मुलीला पाणी देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून, घराची कडी लावून अत्याचार केल्याची घटना घडल्याने सातपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सातपूर कॉलनी परिसरात पत्नीपासून विभक्त राहणारा आणि कोणताही कामधंदा न करणारा आरोपी सुनील भाटे (वय ५७, रा. सातपूर कॉलनी) राहतो. आपल्या स्वत:च्या घरात कुणी नसल्याने त्याचा फायदा घेत मुलीवर अत्याचार केला. काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास रडतच बाहेर आल्याने आईला संशय आल्याने तिच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

लहान बालकाचे संरक्षण कायदा पोस्को अंतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. शनिवारी या संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सुकदेव काळे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here