बिहारमध्ये मद्यधुंद गुंडांनी पोलीस उपनिरीक्षकावर झाडल्या गोळ्या

fire

पाटणा (बिहार) – येथील गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्यांना पोलिसांचेही भय वाटत नाही हे अलीकडच्या काही घटनांवरून दिसते. आता तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही गुंडांकडून लक्ष्य केले जात आहे. बिहारच्या पाटणामध्ये बाढ रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे पोलीस दलातील उपनिरीक्षकावर गुंडांनी गोळ्या झाडल्याची घटना घडली.

विपिन कुमार सिंह असे जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विपिन कुमार हे आपल्या परिसरात गस्त घालण्यासाठी निघाले होते. काही वेळाने जखमी अवस्थेत त्यांना बाढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना पुढील उपचारासाठी पाटणा येथील पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पाटणा येथून जवळपास ७० किलोमीटरवरील बाढ परिसरात शनिवारी रात्री विपिन कुमार हे गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी परिसरातील एक दुकान खुले असल्याचे त्यांना दिसले. तेथे ते गेले असता, काही जण दारू पिऊन धिंगाणा घालत होते. विपिन कुमार यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. मात्र, त्यांना तेथून जाण्यास नकार दिला. त्यांनी अन्य पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यासाठी फोन केला.

त्याचवेळी त्यातील एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यात ते गंभीर जखमी झाले. काही वेळाने इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्याआधीच हल्लेखोर तेथून पसार झाले होते. पोलिसांनी जखमी विपिन कुमार यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पाटणा येथे हलवण्यात आले. हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलीस छापेमारी करत आहेत. बिहार मेन्स पोलीस असोसिएशनने या घटनेचा निषेध नोंदवला असून, आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हे दोन्ही आरोपी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील रहिवासी आहेत. कंटेनर पाठीमागे घेण्यावरून चाकण चौकात बाचाबाची झाल्याने हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here