चोरट्यांकडून पोलिसांनी 12 लाख 45 हजारांचा ऐवज केला जप्त
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट तीनने अटक केली आहे. त्यांच्याकडून घरफोडीचे 7 गुन्हे उघडकीस आणून 12 लाख 43 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. सनीसिंग पापासिंग दुधानी (वय – 21) आणि बिरजूसिंग रजपूतसिंग दुधानी (दोघेही रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सनीसिंग याच्यावर घरफोडी, वाहनचोरी असे 20 गुन्हे दाखल आहेत. बिरजूसिंगवर 51 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून सोने व चांदीचे दागिने, तिजोरी, रोख रक्कम, चोरीचे दागिने मोडून खरेदी केलेली दुचाकी, गुन्ह्यात वापरलेली मोटार असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी येथे दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. त्यावेळी पोलिस कर्मचारी संतोष क्षीरसागर यांना दोघांची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी आणि पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे यांच्या पथकाने शेवाळेवाडी परिसरातून सनीसिंग याला पकडले. चौकशीत त्यांनी वारजे येथील घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर झाली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, गुंगा जगताप, दीपक क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, दीपक मते, एकनाथ वंâधारे, अनिल शिंदे, राजेंद्र झुंजूरके, रामदास गोणते, मच्छिंद्र वाळके, कल्पेश बनसोडे, हनुमंत गायकवाड, सचिन गायकवाड, विल्सन डिसोझा, संदीप तळेकर, नितीन रावळ, साळुंखे, प्रकाश कट्टे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली







