समुद्रपूर (वर्धा जिल्हा प्रतिनिधी रितेश जुमडे) – येथील मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर येथील कलाशिक्षक मनोज बाचले यांना कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय भरीव व वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार -2021 साठी निवड करण्यात आली
यामध्ये राज्यातील उत्कृष्ट शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविणारे शिक्षक मनोज बाचले यांनी covid-19 च्या काळामध्ये शाळा बंद असली तरी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण तसेच ऑफलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला. तसेच ऑनलाईन स्पर्धा व उपक्रम राबविले शैक्षणिक व सामाजिक कार्य करणारे व्यक्तींना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
शिक्षक व शिक्षिका यांचे शैक्षणिक पाहून येथील कार्य पाहून हा पुरस्कार दिला जातो. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुका मुक्ताबाई विद्यालयाचे शिक्षक मनोज बाचले यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2021 साठी निवड करण्यात आले. त्यांचे सर्व मित्र परिवार तसेच संस्थेचे अध्यक्ष सुधाकरराव घोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. कल्पना शिंदे, शिक्षक व कर्मचारी उसाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोज बाचले यांना हा पुरस्कार 28 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता सिद्धिविनायक हॉल नवी मुंबई ऐरोली येथे सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सिने अभिनेता जयराज नायर, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार दीपक पाटील, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ समाजसेविका सौ. जयश्री ताई सावर्डेकर, शिक्षण उपसंचालक पुणे सुरेश माळी ,बहुमुंबई, अध्यापक संघाचे अध्यक्ष हिरामण पाटील यांच्या शुभहस्ते या पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.




