सार्वजनिक बांधकाम विभागाची भूसंपादन करतांना शेतकऱ्यांची दिशाभूल

prakasha-toranmal-road

राज्य महामार्ग प्रकाशा ते तोरणमाळ रस्त्याच्या कृती आराखड्यात परस्पर बदल

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा ते तोरणमाळ या राज्य महामार्ग चौपदरीकरण चे काम सुरू असून भूसंपादन करताना शेतकऱ्यांची दिशाभूल करुन विनापरवाना किंवा संमतीशिवाय जमिनी हडप करण्याचा प्रकार शासनाकडून करण्यात असल्याचा आरोप कार्थदेदिगर येथील शेतकऱ्यांनी केला आहे तसेच विकास कामासाठी आम्ही अडथळा निर्माण करणाऱ नाही फक्त आम्हाला आमच्या जमीनीचा योग्य मोबदला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

toranmal-road

सध्या राज्य महामार्ग प्रकाशा ते तोरणमाळ रसत्याचे काम प्रगती पथावर असून सदर रस्ता आराखडा प्रमाणे प्रकाशा _ वैजाली_ वाघोदा _कलसाडी-म्हसावद आहे मात्र या १३किमी चे काम काथर्दे दिगर गावाकडून केवळ सात किमी अंतराचे करून कामात फेरफार केला गेला आहे प्रकाशा ते काथर्दे दिगर रस्ता हा केवळ गाडरस्ता होता परंतु त्याला राज्य महामार्गाचा दर्जा मिळाल्याने चौपदरीकरण करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाकडून संपादीत केल्या जात आहेत म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

prakasha-farmer

यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून देखील प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे मत डॉ गिरासे यांनी मांडले आहे सध्या रस्त्याचे काम गावकर्याकडून थांबविण्यात आले असून न्याय मिळणार नाही तोपर्यंत काम सुरू होवू देणार नाही असा पवित्रा स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे .७ मिटर अरूंद असणारा रस्ता ४५मी करण्यात आला असून याची नोंद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसल्याचे रस्त्यालगतची शेती असलेल्या शेतकर्यांची झोप उडाली आहे मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शेतकऱ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.तरी सदर महामार्ग लगतच्या शेतीचे मोजमाप करून जमीनीचा योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी लावुन धरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here