पुण्यात भररस्त्यात तलवारीने केक कापणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांचा दणका

cake-cut-by-swoard

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरातील गणेश पेठ परिसरात भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थ डे बॉयला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट एकने अटक केली आहे.

समीर अनंत ढमाले (वय २७, रा. लोणकर वाडा, गणेश पेठ) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. समीर ढमालेने भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार अजय थोरात यांना मिळाली होती. तलवारीने केक कापल्याचा व्हायरल फोटोही पोलिसांच्या हाती लागला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, अमोल पवार, महेश बामगुडे यांच्या पथकाने समीर ढमालेला गणेश पेठ भागातून अटक केली.

समीर याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून त्याच्यावर खडक पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. भररस्त्यात साजरा केल्या जाणाऱ्या वाढदिवसांमुळे सामान्यांना त्रास होत असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे आल्या होत्या. गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईमुळे वाढदिवस साजरा करणाऱ्यांना जरब बसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here