सोमेश्वर कॉलनीत तरुणाचा आढळला मृतदेह; पिस्तुल आढळल्याने खळबळ

buland-police-times

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – येथील एका युवकाने देशी बनावटीच्या पिस्टल मधून स्वत:च्या छाती मध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली असावी असा अंदाज बांधण्यात आला आहे…

याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत रोहित राजेंद्र नागरे (वय २८ रा.शिवनेरी चौक,आठ हजार वसाहत,सातपूर कॉलनी ) हा दि.१३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री बारा वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता आपली दुचाकी पल्सर १५० एमएच.१५ एफजे ४६८७ घेवून रात्री १२ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान सातपूर औद्योगिक वसाहत व भवर मळा मधून जाणाऱ्या नाल्याच्या कडेच्या रस्त्यावर एका झाडाखाली बसला होता.

याच वेळी त्याने स्वत: देशी बनावटी पिस्टल मधून गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी समजते आहे.घटनास्थळावरून देशी बनावटीची पिस्टल व त्याची दुचाकी देखील मिळाली आहे. पिस्टल मध्ये झाडलेली एकच गोळी होती. रोहित यांचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नसून कोणाशीही वाद नसल्याची माहिती नातेवाईकांनी यावेळी दिली.

पोलिसांनी शेवटचे फोन कॉल्स व इतर माहिती घेण्यासाठी रोहित यांचा मोबाईल ताब्यात घेतला असून मोबाईल मधील व्हॉटस अँप स्टेट्स तपासले असता सर्व स्टेट्स प्रेमभंग अथवा प्रेमप्रकरनातून आत्महत्या झाल्याचे दिसून येत असल्याने सातपूर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची घटना नोंदविण्याचे काम सुरु आहे.रोहितने आत्महत्या केली की कोणी आत्महत्या चा बनाव करून हत्या केली. यांचा अधिक तपास सातपूर पोलीस स्टेशन घेत आहे.

यावेळी सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, सातपूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, गंगापूर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, मनसे गटनेते सलीम शेख आदी घटना स्थळी माहिती घेण्यासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here