ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पनवेल तालुक्यातील दापोली गावात आज शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास दुहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत आई आणि मुलीची हत्या करून आरोपी फरार झाला आहे. सध्या फरार आरोपीचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे. ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे. पनवेल शहर पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात दोन मृतदेह पडल्याचे दिसून आले होते.
सुरेखा वळखडे (आई) आणि सुजाता वळखडे (मुलगी) असे हत्या झालेल्या माई लेकीची नाव आहे. तर सुरेखा वळखडे यांचा नवरा देखील या घटनेत जखमी झाला असून त्याच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते पनवेल तालुक्यातील दापोली गावात राहत होते. मात्र शुक्रवारची सकाळ ही दोघांच्या आयुष्यातील शेवटची सकाळ ठरली. कारण त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका इसमाने सकाळी त्याच्या घरात शिरून सुरेखा आणि सुजताची हत्या केली आणि हत्या केल्यानंतर आरोपी, घराच्या मागच्या खिडकीतून उडी मारून फरार झाल्याचे सांगितले जात आहे.
आरोपी हा वडखळे कुटुंबाच्या शेजारी राहत होता. आरोपीच्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे एकटा असलेल्या आरोपीने सुरेखा वळखडे यांची 18 वर्षाच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या लग्नाला वळखडे कुटुंबाने नकार दिला. हाच राग मनात धरून आज आरोपीने घरात असलेल्या आई आणि मुलीवर वार करून तिची हत्या केली. यावेळी घरात सुजाता हिचा पती देखील होता. तो जखमी झाला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली आणि हत्येकरचा शोध सुरू केला आहे. हत्या करणारा आरोपी हा डंपर चालक आहे आणि त्यांचा शेजारी देखील होता. तो दोघींची हत्या करुन फरार झाला आहे.






