जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी रिकेष जुमडे) – स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महा. सेवाग्राम.त.जि.वर्धा. येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त १४/०२/२०२१ ते १८/०२/२०२१ जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शुक्रवार दि.१९/०२/२०२१ ला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन बक्षिस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

drawing-1

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सतीश राऊतसाहेब (उपाध्यक्ष ग्रा. शि.संस्था, वर्धा ), प्रमुख अतिथी कु. साधना घोडखांदे (प्राचार्य यशवंत विद्यालय, सेवाग्राम), प्रा. उमाकांत डुकरे, श्री. श्रीराम पातोंड, शिक्षक प्रतिनिधी सौ.वंदना राऊत, मिडलस्कुल प्रतिनिधी सौ.शिला वानखेडे, जेष्ठ शिक्षक श्री.संजय देशमुख तसेच इतर शिक्षक यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारीतोषिक देण्यात आले.

drawing-2

पारीतोषिकांची निवड कलाशिक्षक श्री. आशिष पोहाणे सर यांनी केली. तर गट अ (१ली ते ५वी) मधुन प्रथम कु. नेहा वाघ (गांधी सिटी पब्लीक स्कुल, वर्धा ), व्दितीय कु. सेजल जाचक (सेंट जाॅन हायस्कुल,पुलगाव), तृतीय कु. अनन्या जाचक (गांधी सिटी पब्लीक स्कुल पुलगाव), प्रोत्साहन प्रतिक सयाम (यशवंत विद्यालय, सेवाग्राम), कु. यशिका भोयर (कस्तुरबा विद्या मंदिर, सेवाग्राम) गट— ब (६वी ते १०वी) प्रथम कुचेवार (स्कुल आॅफ स्कार्लस,वर्धा) व्दितीय कु. नेत्रा भागवतकर (गांधी सिटी विद्यालय,वर्धा) तृतीय गुजंन चुटे (यशोदिप हायस्कुल वर्धा) प्रोत्साहन कु. प्रियंका सयाम (यशवंत विद्यालय, सेवाग्राम) कु. यशिका खोरीया (सेंट जाॅन हायस्कुल, पुलगाव) ईशिता सोनी (चन्नावार ई—विद्या मंदिर,वर्धा) बक्षिस पात्र विद्यार्थ्याना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारीतोषिक देऊन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन श्री. सोनटक्के सर व आभार वैद्य मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. उमाकांत डुकरे,अशोक मापारी, दिलीप चव्हाण, अनिकेत कोल्हे, कलाशिक्षक विशाल जाचक, व यशवंत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here