पुडुचेरीत काँग्रेसचे सरकार कोसळले, बहुमत सिद्ध न केल्याने बसला धक्का…

पुड्डुचेरी – देशात काँग्रेसला दररोज धक्का बसू लागला आहे. बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे काँग्रेसचे पुडुचेरीतील सरकार कोसळले आहे. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र ते यामध्ये अपयशी ठरल्याचे राज्यपालांनी घोषित केले. विधानसभेत दाखल होण्यापूर्वी व्ही. नारायणसामी यांनी सकाळी आपण बहुमत सिद्ध करु अशी घोषणा केली होती. मात्र त्यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करता आले नाही.

पुडुचेरी विधानसभेच्या ३३ जागा आहेत. त्यापैकी ३० सदस्यांची निवड ही निवडणुकीतून होते. तर ३ सदस्यांची निवड केंद्र सरकार करते. राज्यपालांनी काँग्रेस सरकारला सोमवारी संध्याकाळपर्यत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्याअगोदर काँग्रेसचे आमदार के. लक्ष्मीनारायण आणि द्रमुकचे आमदार व्यंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला होता. त्यामुळे ३३ सदस्य असलेल्या पुडुचेरी विधानसभेत काँग्रेस-द्रमुक आघाडीच्या आमदारांची संख्या ११ झाली आणि विरोधी पक्षांचे १४ आमदार आहेत.

२०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने १५ जागांवर विजय मिळवला होता. तर द्रमुकाच्या ३ आमदारांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेच्यावेळी सर्थन केले होते. यातील एका आमदाराने रविवारी आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला. आत्तापर्यत ५ आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजिनामा दिला आहे. त्यामुळे नाराणयसामी सरकार संकटात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here