पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ओढ्यात गुरांना पाणी पाजण्यावरून झालेल्या वादातून तरुणाने दिवसाढवळ्या बंदुकीतून गोळ्या झाडून एकाचा खून केला आहे. मुळशी तालुक्यातील माळीण गावात सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अजय अनुराग साठे (वय 40) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बापू लक्ष्मण जोरी (वय 24) याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अजय साठे गुरांना पाणी पाजण्यासाठी जात होता. त्यावेळी ओढ्यात गुरांना पाणी पाजण्यावरून बापू आणि अजय यांच्यात वादावादी झाली. रागाच्या भरात अजयने बापूच्या कानाखाली मारली. याचा राग आल्याने बापूने घरी जाऊन छऱ्याची बंदूक आणून त्या बंदुकीतुन अजय साठे याच्यावर गोळी झाडली. त्यामध्ये अजय गंभीर जखमी झाला होत
त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पौड पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास पौड पोलीस करत आहेत.






