पुण्यात पती आणि सासूच्या छळास कंटाळून महिलेची आत्महत्या

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पती आणि सासूच्या छळाला कंटाळून महिलेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना धायरीतील बेनकर वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा निखिल गरुड (वय 31, रा. रायकरमळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती निखिल गरुड आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहा यांची आई साधना जाधव (वय 56) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निखिल व नेहा यांचे 10 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आहे. निखील एका खासगी कंपनीत काम करत. तर नेहा देखील नोकरी करत होत्या. फ्लॅट घेण्यासाठी आणि घर खर्च करण्यासाठी निखील पत्नी नेहाचा सतत छळ करत होता.

तिला मारहाण देखील करत होता. त्याशिवाय त्यांनी जबरदस्तीने नेहाला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही आरोपी तिचा छळ करत होते. छळाला कंटाळून नेहाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here