धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी सुरेश बागडे) – परंडा तालुक्यातील बोडका येथील धनाजी माने यांनी ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून मालकी हक्काच्या जागेत आतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करून बांधकाम बंद करावे अन्यथा आत्मदहन करू असा इशारा शेतकरी रघुनाथ करडे यांनी दिला आहे .
गटविकास अधिकारी यांना दि ३ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की माझ्या वडीलांच्या नावावर बोडका येथिल गट नंबर १४४ मध्ये १ हेक्टर ३६ आर जमीन असुन या गट नंबर सेजारील धनाजी माने यांची १८ बाय २६ फुट जागा आहे .
माने यांनी ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करून कागदपत्रात जागेची वाढ करून बोगस कागदपत्राच्या आधारे आमच्या मालकी ह्रक्काच्या गट नंबर १४४ मध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसेच ऑक्ट्रासिटी केस करण्याची धमकी देत आहे . माने हे दावा करीत असलेली जागा माझ्या मालकीची असून माने यांचा कसलाही सबंध नाही. तरी ८ दिवसात बोगस वाढीव नोंदची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल तरीही न्याय नाही मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा शेतकरी करडे यांनी दिला आहे .






