सुसाट निघालेला रिक्षाचालक थेट तलावात विसावला

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – सुसाट वेगात रिक्षा चालवताना नियंत्रण सुटल्याने रिक्षाचालक नालासोपारा पश्चिमेकडील बौद्ध स्तूपाजवळील तलावात कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये सदर चालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र कर्जबाजारीपणाला कंटाळून या रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक कोंडीबा मारुती कोंडलकर वय 40 हा त्याची पत्नी मनीषा, मुलगी कोमल वय -16, सुजाता 15 आणि मुलगा आदिराज वय 12 असे गेल्या 2 वर्षापासून भाड्याने राहत होते. लॉकडाऊनमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. कोंडीबाला दारूचे व्यसन जडले होते.

सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी शिवाजी सुळे यास त्याच्या जुनी तव्हेरा गाडीवर लोन करायचे होते. त्यासाठी जामीन राहण्यासाठी कोंडीबा आणि गोरेगावकर असे त्यांच्यासोबत आगाशी पतसंस्था येथे गेले. कोंडीबा यांनी जामीनदार राहण्यास नकार दिला. त्यानंतर ते घरात तसेच इतरांशी काहीएक बोलत नव्हते.

कोंडीबाची पत्नी मनीषा हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात कोंडीबा दारु पिण्याचे व्यसन होते. आमच्या घरात आर्थिक अडचण होती. कोंडीबा हा शिवाजी सुळे यांच्या तवेरा गाडीकरीता जामीन राहिलेला आहे, ते मला रद्द करायचे आहे, असं सांगितलं. त्यानंतर सुळे यांनी कागदपत्रे परत करतो असं सांगितलं होते.

’13 मार्च 2021 रोजी रात्री 10 वाजता ते दारु पिऊन घरी आले होते. त्यानंतर थोडेसे जेवून कोणास काही एक न बोलता ते झोपले. आज रविवारी दिनांक 14 मार्च रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास घरात काहीही न सांगता रिक्षा घेवून गेले. त्यानंतर सकाळी 6 वाजताच्या सुमारास काका यशवंत पोकळे यांनी घरी फोन करून कळवले की सकाळी त्यांचं अपघाती निधन झालं आहे,’ अशी माहिती मृत धोंडीबा यांच्या पत्नीने दिली आहे.

कर्जबाजारी झाल्याने सदर रिक्षाचालकाने हे टोकाचे पाउल उचलले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होईल, असं नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितलं आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here