‘या’ राशीच्या लोकांनी बाळगावी निर्णय घेताना सावधगिरी; साप्ताहिक राशीभविष्य

rashibhavishya

साप्ताहिक राशीभविष्य

मेष – अडचणींवर मात कराल
मेष राशीच्या व्ययेषात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-बुध लाभयोग होत आहे. समस्या सोडवताना भावना व कर्तव्य यांची योग्य सांगड घाला. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याला खीळ घालण्याचा प्रयत्न होईल. अडचणींवर मात कराल. नवीन परिचयांवर जास्त विश्वास ठेवू नका. जबाबदारी वाढेल. शुभ दिनांक – 18, 19.

वृषभ – योजनांना गतिमान बनवा
वृषभ राशीच्या एकादशात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीची नवी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकसंग्रह वाढवा. योजनांना गतिमान बनवा. गैरसमजातून ताणतणाव निर्माण होतील, मात्र रागावर ताबा ठेवा. रेंगाळलेली कामे होतील.
शुभ दिनांक – 19, 20.

मिथुन- गुंतवणुकीत सावध राहा
मिथुन राशीच्या दशमेशात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-बुध लाभयोग होत आहे. अडचणींवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कायद्याचे पालन करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कामे करण्यास वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात वाढ होईल, मात्र गुंतवणूक जपून करा. शिक्षणात आळस नको. शुभ दिनांक – 14, 15.

कर्क – खरेदी-विक्रीत फायदा होईल
कर्क राशीच्या भाग्येषात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. रेंगाळलेली कामे करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव कमी होईल. प्रतिष्ठा वाढवणारी घटना घडेल. वक्तव्य करताना काळवेळाचे भान ठेवा. वास्तू, दुकान खरेदी-विक्रीत फायदा होईल. चित्रपट क्षेत्रात प्रगती होईल. शुभ दिनांक – 17, 19.

सिंह – व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा
सिंह राशीच्या अष्टमेषात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-बुध लाभयोग होत आहे. व्यवसायात भावनेच्या भरात गुंतवणूक करू नका. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक तुम्हाला काsंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. इतरांनी केलेल्या चुका सुधाराव्या लागतील. शुभ दिनांक – 19, 20.

कन्या – योजना मार्गी लागतील

कन्या राशीच्या सप्तमेशात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. तुमच्यावर टीका करणारे लोक मैत्रीची भाषा करतील. घरासंदर्भातील प्रश्न सुटेल. दिलासा देणाऱया गोष्टी घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. ठरवलेल्या योजना लवकर मार्गी लागतील. शुभ दिनांक- 19, 20.

तूळ – निर्णयात सावधगिरी बाळगा

तुला राशीच्या षष्ठsशात सूर्य-शुक्र प्रवेश करीत आहे. चंद्र-बुध लाभयोग होत आहे. भावनेच्या आहारी जात घेतलेला निर्णय चुपू शकतो. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याबद्दल गैरसमज होतील. इतरांच्या चुका तुमच्यावर लादल्या जातील. व्यवहार सावधपणे करा. तुमचा अवमान करण्याचा प्रयत्न होईल. शुभ दिनांक- 16, 17.

वृश्चिक -किरकोळ अडचणी येतील

वृश्चिकेच्या पंचमेशात सूर्य-शुक्र प्रवेश, चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. आठवडय़ाच्या मध्यावर किरकोळ अडचणी येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा पुढे जटिल समस्या निर्माण होईल. जुने गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांसोबत चांगले संबंध ठेवा. शुभ दिनांक- 15, 19.

धनु – नोकरीत वर्चस्व वाढेल

धनुच्या सुखस्थानात सूर्य-शुक्र प्रवेश, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. व्यवसायात महत्त्वाचा निर्णय घ्याल. आठवडय़ाच्या सुरुवातीला कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व वाढेल. पुटुंबात भेटीगाठी होतील. कला क्षेत्रात मन रमेल. शुभ दिनांक- 16, 17.

मकर – प्रत्येक दिवस उत्साहाचा

मकरेच्या पराक्रमात सूर्य-शुक्र प्रवेश, चंद्र-बुध लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील कामे मार्गी लावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात थोरामोठय़ांच्या साहाय्याने यश मिळवाल. विरोधकांना योग्य उत्तर द्याल. योजनाबद्ध कार्याची मांडणी करा. प्रत्येक दिवस उत्साहाचा ठरेल. नोकरीत चांगला बदल करता येईल. चर्चा यशस्वी होईल. शुभ दिनांक- 14, 15.

कुंभ – प्रेरणा देणारी घटना घडेल

कुंभेच्या धनेशात सूर्य-शुक्र प्रवेश, चंद्र-मंगळ युती होत आहे. वादाला जास्त महत्त्व न देता ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा. कला क्षेत्रात प्रेरणा देणारी घटना घडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे सिद्ध करता येतील. जुने वाद, गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल. व्यवसायात नवी संधी मिळेल. शुभ दिनांक- 15, 16.

मीन – कामाचा उरक वाढवा

स्वराशीत सूर्य-शुक्र प्रवेश होत आहे. चंद्र-गुरू लाभयोग होत आहे. वेळकाढू धोरण दूर ठेवून कामांचा उरक वाढवा. किरकोळ समस्यादेखील नुकसानदायक ठरू शकते हे लक्षात असू द्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तणाव दूर होतील. नोकरीतील किचकट कामे करून घ्या. शुभ दिनांक- 16, 17.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here