नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – येथील अनेक गुन्ह्यांचा उलगडा होत असताना, पोलिसांवरदेखील ग़ंडातर आल्याचे दिसून येत आहे. नागपूर पोलिस दरातून गेल्या 24 तासात सहा पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून त्यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आता अरविंद भोळे या पोलीस निरीक्षकावर बलात्कार चा गुन्हा दाखल झाला असून त्यांचे निलंबन करण्यात आले. भोळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधवेशी लग्न करून शारीरिक शोषण केल्याने त्यांच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर होते.
दुसरी घटना मानकापूर पोलीस ठाण्यातील आहे. जखमी वृद्ध रस्त्यावर पडून असतांना घटनास्थळावर न पोहचणे त्यानंतर त्या वृद्धाचा मृत्यू होणे त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी चौघांचे निलंबन करण्यात आले त्यात एक पोलीस उपनिरीक्षक आहे.
तर तिसरी घटना यशोधरा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक व उप पोलीस निरीक्षक यांनी आत्महत्येच्या प्रकरणात खंडणी उकळली त्यामुळे एका उप निरीक्षकाला अटक करण्यात आली. त्यामुळे नागपूर पोलीस दलात चालंय तरी काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.






