लग्न करुन नवरोबांना गंडवणाऱ्या डॉलीची डोली पोलिस स्टेशनात

तब्बल आठ नवरोबांना घातला होता गंडा

नांदेड (प्रतिनिधी) – एका लुटारु नवरीने पैसे उकळण्यासाठी तब्बल आठ लग्न केली. प्रत्येक नव-याकडून पैसे घेऊन धूम ठोकली. पण शेवटी तिचं बिंग फुटलंच. आणि या डॉलीची डोली पोलीस स्टेशनमध्ये गेली. लग्न करुन ही नवरी नवऱ्यांना गंडा घालायची.

डॉली की डोलीमधली ही डॉली होय. पैशासाठी वेगवेगळी लग्न करायची आणि धूम ठोकायची. अशीच एक खरीखुरी डॉली बीडमध्ये सापडलीय. पोलिसांच्या ताब्यात असलेली हीच ती नवरोबांना गंडा घालणारी नवरी. याने एक दोन नव्हे, तब्बल ८ जणांशी लग्न करुन त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

डॉली वेगवेगळ्या माध्यमांतून सूत जमवून लग्न करायची. मग लग्नाच्या रात्री धमक्या देत असे. पैसे दे नाही तर फसवल्याची आणि बलात्काराची तक्रार करेन असे धमक्या देत होती. तरुणांनी पैसे दिले की पळून जायची, अशी तिची मोडस ऑपरेंडी होती.बीडमधल्या शिराळ तालुक्यातल्या एकाशी तिने लग्न केलं आणि अशीच धमकी दिली. पण तो तरुण वेळीच सावध झाला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार केली.आता या डॉलीची डोली पोलीस स्टेशनमध्ये गेलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here