कुरार पोलिसांची कारवाई; तब्बल ६३ किलो गांजा केला जप्त

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – कुरार पोलीसांनी मिळालेली गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत मालाड पूर्व भागात ६३ किलो गांजा जप्त केला आहे. या गांज्याची किंमत अंदाजे ९ लाख ४५ हजार आहे.

मिळालेल्या गुप्तमाहीतीच्या आधारे कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवशक्ती चाळ, श्रीरामनगर, स्मशानभुमीसमोर, मालाड पुर्व, मुंबई येथे सचिन शहाजी साळुंके (वय २८, व्यवसाय भाजीपाला विक्री, रा. शिवस्मृती सेवा मंडळ, रुम नं. ५, श्रीराम नगर, कुरारगाव, मालाडपूर्व, मुंबई) याला गांजा हा अंमली पदार्थ विक्री व साठा करीत असलेबाबत गोपनिय सुत्रा कडून खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्या अनुषंगाने पोनि चाळके, पोनि पितळे, सपोनि भोये व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी सापळा टाकून अंदाजे 63 किलो गांजा अंदाजे किंमत 9,45,000/- हा आरोपीत इसमाच्या ताब्यात मिळालेला असुन सदर बाबत पंचनामा व गुन्ह्याबाबत कायदेशिर प्रक्रिया करून कुरार पोलीस स्टेशन येथे वि.स्था. गु. र. नं. 31/2021 कलम 8 क, 20(ब)ii(क) NDPS अधिनियम, 1985 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

ही कारवाई पोनि चाळके, पोनि पितळे, सपोनि भोये, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोना/ मोरे, पोशि/ आहेर, पोना/ कावले, पोशि/ जोगलपुरे, पोशि/ भोगले, पोशि सपकाळ यांनी केली असून, पुढील तपास पोनि प्रसाद पितळे करीत आहेत.

kurar-police

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here