मुंबई (संपादक सुनिल पाटील) – दिनांक १९/०३/२०२१ रोजी गुन्हे शाखा-१ काशिमीरा युनीटचे पो.ना./३०८ पुष्पेद्र भिम थापा यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरुन भाईंदर पश्चिमेस जय जलाराम जनरल स्टोअर्स या दुकानात छापा टाकुन कारवाई केली असता महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा, पानमसाला व तंबाख्नु असा एकुण ९,८८,१३२/रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस अटक करण्यात आला आहे. सदर बाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११२/२०२१, भा.द.वि.स कलम-३२८,१८८,२७३ अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चेकलम २६(२), (४), ३०(२), (ए) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिमेस गणेश देवोल नगर, गटाराच्या बाजुला, सार्वजनीक संडास जवळील रुम मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटखा, पानमसाला व तंबाख्नु असा एकुण ५,८१,१४४/-रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला असुन एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर बाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११३/२०२१, भा.द.वि.सकलम-३२८,१८८,२७३ अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम २६(२), (४), ३०(२), (ए) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन दोन्ही कारवाईत मिळुन एकुण १५,६९,२७६ रुपये किमतीचा गुटखाजन्य व तंबाखुजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. डॉ.महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा.श्री. रामचंद्र देशमुख, सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे), जितेंद्र वनकोटी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अविराज कुराडे पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकटीकरण शाखा१, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.निरी. विलास कुटे, पोउपनिरी. हितेंद्र विचारे, सहा.पो.उप-निरी. राजु तांबे, पोहवा/३६ संदिप शिंदे, पोहवा/२२१७ किशोर वाडिले, पोहवा/११०९ अविनाश गर्जे, पोना/३०८ पुष्पेंद्र थापा, पोना/१६४४ सचिन सावंत, पो.शि./३६८७ विकास राजपुत, तसेच पोशि./३३७५ राजेश श्रीवास्तव, /पो.शि./३५०२ सतिष जगताप, पो.शि./१८६८ महेश वेल्हे, पो.शि./३५७९ सुशिल पवार सर्व नेम. गुन्हे प्रकटीकरण शाखा-१, यांनी केली असून गुन्हयांचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक बजरंग अडसुळ हे करीत आहेत.






