लाच मागितल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयाच्या लिपीकाला अटक

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपीकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याला कोर्टाने 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. प्रमोद गणेश तुपे (वय 30, रा. सासवड, ता. पुरंदर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

तक्रारदार यांना शेतजमिनीची मोजणी करायची होती. त्यासाठी त्यांनी सासवड येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मोजणी करून देण्यासाठी तुपे याने 10 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 4 हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी तुपे याला अटक करून कोर्टात हजर केले. त्यावेळी विशेष कोर्टाने 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. याप्रकरणी सहायक पोलीस आयुक्त वर्षाराणी पाटील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here