जीभ लावून बॅटरीची चार्जिंग चेक करताना स्फोट; 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

मिर्जापूर – हलिया पोलीस स्टेशन हद्दीतील मतवार गावात शुक्रवारी मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. कावळा चार्जरने बॅटरी चार्ज करून झाल्यानंतर जीभ लावून चेक करत असताना बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे विद्यार्थ्याच्या तोंडाच्या चिथड्या झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हलिया पोलीस स्टेशन हद्दीतील मतवार सरिहवा मजरा येथील बाबुलाल कोल यांचा 12 वर्षीय मुलगा मोनू इयत्ता सहावीत शिकत होता. तो मतवार पूर्व माध्यमिक विद्यालयात शिकत होता. मोनू शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कावळा चार्जरने मोबाईलची बॅटरी चार्ज करण्यासाठी लावली होती. एका तासानंतर चार्जिंगला लावलेली बॅटरी काढली आणि जीभ लावून चेक करत होता.

या दरम्यान बॅटरीचा स्फोट झाला. बॅटरीचा स्फोट झाल्याने मोनूच्या तोंडाच्या चिथड्या झाल्या. बॅटरीच्या स्फोटाचा धमाका ऐकून कुटुंबातील लोकं घरात आले आणि पाहिले की मोनूचे तोंड रक्ताने माखलेले दिसले. त्यामुळे या लोकांना धक्काच बसला. कुटुंबातील लोकांनी घाईघाईने जखमी मोनूला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

मोनूच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नोकियाची बॅटरी असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्याचबरोबर पोलिसांना माहिती न देता कुटुंबीयांनी मोनूच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here