हिंगणघाट परिसरातील गांगापुर येथे नेहरु युवा केंद्रातर्फे स्वछता अभियान

वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – हिंगनघाट तहसीलचे वडणेरमध्ये डॉ अतुल घोरपडे यांच्या मागदर्शनात जल शक्ती अभियान व नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकारद्वारा हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

गांगापूर गावाचे थोर सुपुत्र स्वर्गीय श्री बाबासाहेब उर्फ मोतीबाबा घोरपडे यांच्या समाधी परिसर स्वच्छ करण्यात आला, तसेच गावातील युवा मंडळांनी एकत्रित येऊन “स्वछता अभियान राबविले .आपला गाव स्वच्छ तर देश स्वच्छ” या भूमिकेतून गावातील युवा मंडळी व नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियानाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ अतुल घोरपडे लाभले होते.

motibaba-ghorpade-samadhi-hinganghat

नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयेंसेवक सचिन महाजन युवा प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष राहुल दुरतकर व गावातील नागरिक मयूर भोयर, राजेंद्र अलाम, कैलाश कुडमते, विकास येम्बेवार, श्याम म्हरसकोल्हे आणि गावातील इतर नागरिक एकत्रित येऊन समाधी परिसर व गावाबद्दल भोवतालचा परिसरचा कचरा कापून, सांडपाणी व कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावून गावाला स्वच्छतेचा संदेश दिला.

यावेळी नेहरू युवा केंद्राचे तालुका स्वयंसेवक सचिन महाजन यांनी स्वतः स्वच्छता करून युवकांना मार्गदर्शन केले. जलशक्ती अभियान पाण्याचे महत्त्व व पाणी वापरताना काटकसर कशी करावी याबद्दलची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here