अनुकंपा तत्वावर नवऱ्याला नोकरी लागावी म्हणून सुनेने घडवून आणली सासऱ्याची हत्या

बौरानी (बिहार) – सासऱ्याच्या जागी रेल्वेत नवऱ्याला जॉब मिळावा म्हणून सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने सासऱ्याचा काटा काढला. सासऱ्याला मारण्यासाठी तिने कॉन्ट्रक्ट किलर्सला दोन लाख रुपयांची सुपारी दिली. सतीश चौधरी असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. बिहारमधील बौरानी रेल्वे कॉलनीत हा प्रकार घडला आहे.

सतीश चौधरी हे रेल्वेत टेक्शिनशियन पदावर होते. तर त्यांचा मुलगा राजेश याला चांगली नोकरी नव्हती. राजेशला देखील रेल्वेत नोकरी लागावी असे त्याची पत्नी साक्षी कुमारीला वाटायचे. त्यामुळे साक्षीने तिच्या सासऱ्याच्या जागी पतीला नोकरी मिळावी म्हणून सासऱ्यांच्या हत्येटा कट रचला. तिने सासऱ्यांच्या हत्येची सुपारी दिली. 24 मार्चला दोन अज्ञात व्यक्तींना सतीश यांच्यावर त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडल्या. त्यात सतीश यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी रेल्वे पोलीस तपास करत असताना त्यांना साक्षीवर संशय आला. त्यामुळे त्यांनी तिची चौकशी केली असता तिने तिचा गुन्हा कबूल केला. या प्रकरणी पोलिसांनी साक्षी, तिचा प्रियकर मकूब व दोन कॉन्ट्र्रॅक्ट किलर्सला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here