कादर खान यांच्या मुलाचं निधन

kader-khans-son-abdul-quddus-dies-in-canada

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – दिवंगत अभिनेते कादर खान () यांचा मोठा मुलगा अब्दुल कुद्दुस खान ) याचा मृत्यू झाला आहे. अब्दुल गेली काही वर्ष मूत्रपिंडाच्या आजारामुळं त्रस्त होता. बुधवारी उपचारादरम्यान कॅनडामधील रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. कॅनडामधील टोरंटो येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले.अब्दुल सिनेसृष्टीत कार्यरत नव्हता. मात्र त्याचे वडिल कादर खान यांचा फॅन फॉलोइंग जगभरात आहे. त्यामुळं त्यांच्या चाहत्यांनी अब्दुलच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली जात आहे.

अब्दुलला अभिनयाची आवड नव्हती. त्यामुळं अनेकदा त्याचं वडिलांसोबत भांडणही होतं असे. मात्र त्यानं कॅनडामध्ये एक नाटक कंपनी सुरु केली होती. कल के सुपरस्टार असं या कंपनीचं नाव होतं. परंतु या व्यवसायात तो अयशस्वी ठरला. शिवाय त्याला लाखो रुपयांचं नुकसानही झालं. परिणामी तो कॅनडा विमानतळावर सुरक्षा अधिकारी म्हणून काम करत होता. दरम्यान त्याला मुत्रपिंडाचा आजार झाला. या आजावर त्याचे उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

कादर खान यांचा दुसरा मुलगा आजरा खान हा बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. त्यानं तेरे नाम, मैंने दिल तुझको दिया आणि वॉण्टेड यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली आहे. शिवाय त्यानं अनेक चित्रपटांच्या पटकथा देखील लिहिल्या आहेत. तो देखील आपल्या कुटुंबासोबत कॅनडामध्येच राहात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here