सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या तब्येती बाबत मोठी बातमी आहे. सचिन तेंडुलकरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. आता त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सचिननं स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

‘तुमच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद. वैद्यकीय सल्ल्यानुसार मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. लवकरच बरा होऊन मी घरी परतेल, अशी आशा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. सर्व भारतीय आणि माझ्या टीममधील सहकाऱ्यांना वर्ल्ड कप विजेतेपदाच्या दशकपूर्तीच्या शुभेच्छा ‘ असं ट्वीट सचिनने केलं आहे.


दरम्यान, सचिन तेंडुलकरला मागच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. सचिननं स्वत: ट्विटरवर ही माहिती सर्वांना दिली. ‘माझ्यामध्ये आढळून आलेली लक्षणं सौम्य स्वरुपातील आहेत. कुटुंबीयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे,’ असंही त्याने सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here