मॉलमध्ये नोकरीला लावण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय मुलीवर तरुणाने केला बलात्कार

बेगुसराय (बिहार) – येथे एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मॉलमध्ये नोकरीला लावतो असे सांगून पीडितेला बोलावून घेतले. त्यानंतर तिला डांबून आरोपीने बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी तरूण आणि मॉलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेगुसराय शहरातील एका मॉलमध्ये साफसफाईचे काम करणाऱ्या महिलेने अल्पवयीन मुलीला बोलावून घेतले होते. तिने नोकरीला लावतो असे तिला सांगितले होते. गुरुवारी रात्री आरोपी महिला पीडितेला घेऊन एका घरी गेली. तिला तेथील खोलीत डांबून ठेवले. मॉलमधील अधिकारी असल्याचे सांगून मटिहानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक तरूण तिथे पोहोचला. त्याने पीडितेवर बलात्कार केला.

शुक्रवारी सकाळी पीडितेने त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि आपल्या घरी गेली. कुटुंबीयांना तिने सर्व हकिकत सांगितली. घटनेबाबत समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पीडितेने दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई सुरू केली. आरोपी महिला आणि आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. महिला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेसह आरोपी तरुणालाही अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here