अहमदनगरमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

gang-rape

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील निंबोडी शिवारात 25 वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पिडितेच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी अक्षय माळी याला पोलिसांनी अटक केली असून इतर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. यासाठी भिंगार कॅम्प पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याबाबत सविस्तर असे की, पीडित महिला कामानिमित्त आष्टी येथून नगर येथे आली होती.

काम आटोपल्यानंतर ती रस्त्याने निंबोडी शिवारातून जात असताना तिच्यावर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर पीडितेने भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय माळी याच्यासह त्याच्या दोन साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघे ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्राकडून मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here