शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – शहरातील एकाचा खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.
शहरातील उपजिल्हा रूग्णालयात दि. 1 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास जमावाने हल्ला करत शाहबाज शाह गुलाब शाह (रा. गरिब नवाज कॉलनी, दोंडाईचा) याचा खून केला.
याप्रकरणी जुबेर शेख मुशीर यांच्या फिर्यादीवरून दिपजित महाजन, चेतन राजपुत, युवराज पहेलवान यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांकडून संशयीतांचा शोध सुरू होता. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज हर्षल चौधरी व आणखी एकाला अटक केली. इतर फरार असून त्यांचाही कसून शोध सुरू आहे.






