शहरवासियांच्या दातृत्वाने सलाईनवर असलेले ग्रामीण रुग्णालय ठरतेय उत्कृष्ट कोविड उपचार केंद्र

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाची वैद्यकीय चमू पाठवल्याने आरोग्यप्रशासन हलले

जळगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगांव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू असून, आपण समाजाचे काही तरी दायित्व लागतो अशी भावना धरणगावचे माजी नगराध्यक्ष अजयशेठ पगारिया शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याजवळ बोलून दाखविली आणि याच भावनेतून एका अभिनव उपक्रमाने जन्म घेतला.

कोविड सेंटरला शिवसेनेतर्फे गेल्या १५ दिवसांपासून मसाला हळद दुधाचा पुरवठा होत होता. या उपक्रमाला मदत म्हणून त्यांनी २० लिटर दूध व पारले बिस्कीटांचा पुरवठा केला. या दुधाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या उपस्थितीत कोरोनाबाधितांना वाटप करण्यात आले.
सकल जैन समाजाचे अध्यक्ष अजयशेठ पगारिया यांच्या कार्यातून प्रेरणा घेत जैन समाजातील सामाजिक कार्यकर्ते व शिवसैनिक अक्षय मुथा यांनी रोगप्रतिकारक क्षमता वाढविणाऱ्या आवळा मुरब्बा व फळांचे वाटप कोरोनाबाधितांना केले.

या उपक्रमात धरणगाव येथील अनेक प्रतिष्ठीत नागरिकदेखील पुढे आलेत. आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राहुल जैन, उपाध्यक्ष प्रतिक जैन, सचिव श्रेयास जैन यांनी कोरोनाबाधितांना लागणारे रेमडीसीव्हर इंजेक्शन माफक किंमतीत धरणगाव व जळगाव येथील विविध मेडीकल दुकानावर व्यवस्था करून दिली. तसेच गुलाबराव वाघ यांच्याशी संपर्क करुन औषधांची उपलब्धतादेखील करुन दिली.

दरम्यान सुरुवातीपासूनच जगदंबा अॅक्वाचे वाल्मिक पाटील, वासुदेव चौधरी, प्रशांत पाटील यांचेकडून पाण्याचे जारची मदत होत आहे . आज दुध वाटपकामी अक्षय मुथा, वार्डबॉय विशाल माळी, दिनेश पाटील, सिक्युरिटी गार्ड नामदेव मराठे, विजय पाटील, बाळा विसावे, अमोल सखाराम माळी यांनी सहकार्य केले.

ग्रामीण रुग्णालयातील सर्व वार्ड बाँय, सिक्युरिटी गार्ड उत्तम प्रकारे सेवा देत आहे, सर्व पेशंटला धरणगांव कोविड सेंटर आपले घर वाटत आहे, अशी सेवा डॉ. बन्सी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मयुर जैन, डॉ.चन्द्रकांत पाटील, डॉ कांचन वाणी, हर्षदा पालिवाल, डॉ मोसिन शहा, डॉ महेश कोळंबे, डॉ संदिप पाटील, डॉ जगताप व जयश्री महाले व नऊ नर्सस, ऑफिस स्टॉप, रुग्णवाहिकांचे चालक अविनाश चौधरी, ईश्वर ठाकुर, न पा चे अरुण पाटील, निलेश महाजन, स्वप्नील चौधरी, स्वच्छतागृहाला पाणी पुरवण्याचे काम करणारे देवा तायडे व रवी वाघमारे, मृतदेहांचे पॅकिंगचे काम करणारे राजु करोसीया, कोविड मृतदेह घरी न नेता अंत्यसंस्काराचे कार्य करणारे कोविड स्वच्छता निरीक्षक निलेश वाणी व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.

कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधितांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी दिवसभर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे,वासुदेव चौधरी, काँग्रेसचे विकास लांबोळे, रामचन्द्र महाजन, नंदलाल महाजन, शिवसेनेचे बाळासाहेब जाधव, योगेश वाघ, धिरेंद्र पुरभे,, डी जे पाटील,राहुल रोकडे, किशोर मराठे, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, विनोद रोकडे, अरविंद चौधरी, गोपाल पाटील, , सागर दुर्गे, भाजपचे नगरसेवक गुलाब मराठे, ललित येवले यांचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here