१६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न करुन केला अत्याचार; गुन्हा दाखल

rape-on-minor

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही १६ वर्षांच्या मुलीसमवेत लग्न करुन तिच्यावर अत्याचार करुन गर्भवती करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी नागेश दशरथ लांडगे (वय २५, रा. साठेनगर, महंमदवाडी रोड, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फेब्रुवारीपासून ६ एप्रिलपर्यंत पिडिताच्या घरी तसेच आरोपीच्या घरी घडला. याप्रकरणी सहायक फौजदार मुनीर अब्बाज इनामदार यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नागेश लांडगे याने एका १६ वर्षांच्या युवतीबरोबर लग्नापूर्वी तिच्या घरी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्याबरोबर लग्न केले. तिच्यावर अत्याचार करुन तिला गर्भवती केले. वानवडी पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here