लहान मुलांचे अश्लिल व्हिडीओ फेसबुकवर टाकणाऱ्या जळगावातील सहा जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – लहान मुलांच्या संदर्भातील अश्लिल व्हिडीओ फसबुकवर अपलोड करणाऱ्या सहा जणांवर गुरुवारी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुककडून तपासणी करुन मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २६ मे ते २७ जून २०२० या एका महिन्यात फेसबुकवर आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो अपलोड करणाऱ्या युजर्सवर फेसबुकडून लक्ष ठेवले जात होते. फेसबुकचा एक स्वतंत्र विभाग या संदर्भात प्रत्येक युजरवर लक्ष ठेऊन होता. या विभागाने जगभरातील अकाऊंट तपासले. यात अनेक युजर्सने लहान मुलांच्या संदर्भातील आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याचे आढळुन आले. या अकाऊंटची माहिती फेसबुकने संबधित राज्यांच्या सायबर पोलिसांना दिली आहे. अशीच माहिती महाराष्ट्र सायबर विभागालाही मिळाली. त्या अनुशंगाने महाराष्ट्र सायबर विभागाने राज्यातील त्या-त्या जिल्ह्यातील संशयित अकाऊंटची माहिती संबधित सायबर पोलिस ठाण्यांना दिली त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आले.

यात जळगाव जिल्ह्यातील सौरभ संजय वाणी, अतुल व्यास, रॉकी पाटील, रेवती ठाकुर, सोनाली इंगळे, रक्षा या सहा अकाऊंटवरुन आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड झाल्याचे आढळुन आले आहे. सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन या सहा जणांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत. संबधित अकाऊंटच्या युजर्सवर गुन्हा दाखल केला आहे. या अकाऊंटची माहिती काढणे सुरू आहे. संशयितांची नावे निष्पन्न झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहीती जळगाव जिल्हा सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बळीराम हिरे यांनी दिली आहे. फेसबुकने पाठवलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड करणारे अकाऊंट मिळुन आले. त्या अनुशंगाने प्रत्येक जिल्ह्यात या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here