सासूरवाडीला आलेल्या जावयाने केला अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार

Rape of sister-in-law

बाडमेर (राजस्थान) – येथील चौहटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर तिच्या बहिणीच्या नवऱ्याने बलात्कार केला. त्यानंतर अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीने तिला दिली होती. होळीच्या दिवशी त्याने तिच्यासोबतचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील चौहटन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुलीवर तिच्या बहिणीच्या नवऱ्याने बलात्कार केला. त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढले. ते सोशल मीडियावर व्हायरल केले. पीडितेच्या पालकांनी सांगितले की, जावई तीन महिन्यांपूर्वी घरी आला होता. त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. तसेच याबाबत कुठेही काही सांगितले तर, जीवे मारण्याची त्याने धमकी दिली, असे पीडित कुटुंबीयांनी सांगितले.

या घटनेप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेले. त्यानंतर तिचा जबाब नोंदवून घेतला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here