आंबेडकर जयंतीला मिळालेल्या देणगीच्या वाटणीवरुन झालेल्या वादातून एकाचा खून

लखनऊ (उपसंपादक सय्यद गुलाम हुसेन) – बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गोळा करण्यात आलेल्या देणगीच्या वाटणीत झालेल्या वादामुळे उत्तर प्रदेशमध्ये एका युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राकेश कुमार असं मृत व्यक्तीचं नाव असून ते चंदौली गावातील बीडीसी उमेदवार उषादेवी यांचे पती होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने गोळा करण्यात आलेल्या देणगीवरून राकेश कुमार आणि अमित कुमार यांच्यात गुरुवारी दुपारी वाद झाला या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि राकेश कुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर राकेश कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्याअगोदरच त्यांचा जीव गेला.

किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत राकेश कुमार यांना आपला प्राण गमवावा लागला या प्रकरणात संतप्त नातेवाईकांनी निषेध नोंदवत रस्त्यावर आंदोलन केलं तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रेम प्रकाश मीना यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत लवकरात लवकर तपास करण्याचं आश्वासन देऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

या हाणामारीत अमित कुमार हा देखील गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच घटनेनंतर चंदौली गावामध्ये त्यांना वाचन वातावरण निर्माण झालं आणि संतप्त नातेवाईकांनी रास्ता रोको ही केला परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ही परिस्थिती आटोक्यात आणली गेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here