जळगाव – बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील यांचे वडील शिवदास चिंधू पाटील (वय ७३, मुळ गाव पिंप्री बु।।, ता.एरंडोल) यांचे अल्पशा आजाराने काल (दि. २१) रात्री १० वाजता निधन झाले.
मनमिळावू स्वभावाच्या शिवदास पाटील यांनी मोठ्या जिद्दीने व कष्टाने आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक बहीण, दोन मुले, सूना, ८ नातू असा मोठा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा बुलंद पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक सुनिल पाटील तर लहान मुलगा आधिकराव पाटील देशसेवेकरिता सीआरपीएफ मध्ये आहे.






