भगवान महावीर जैन धर्माचे २४वे तिर्थंकर

    भगवान महावीर जैन धर्माचे २४ वे तिर्थंकर यांची पावापुरी ही अत्यंत पवित्र सिद्धक्षेत्र भूमि आहे. समाज स्त्री शोषण, अंध विश्वास इ. वाईट प्रथेच्या जाळ्यात फसला होता .साधक लोक कर्मकांड प्रचार करत धर्माच्या नावाने पशू बळी देत. अहिंसेचे पुजारी महावीरांनी सांगितले पृथ्वी वर सगळेच प्राणी समान . सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. सगळे जगू इच्छितात. कोणी मरू इच्छित नाही. प्राण्यांना मारू नका. त्रास देऊ नका, गुलाम बनउ नका. शोषण करू नका. हिंसेमुळे शत्रुता वाढते.

    समाजातील वाईट चालीरीती विरुद्ध महावीरांनी जबरदस्त संघर्ष केला. महात्मा गांधींनी सांगितले की विश्वातील कोणत्याही धर्माने अहिंसेबद्दल इतकी सूक्ष्म व्यापक परिभाषा व्याख्या केलेली नाही. जितकी जैन धर्माने केली आहे.
    विश्वहितंकर श्री १००८ भगवान महावीर स्वामी
    भगवान महावीर स्वामींचा जन्म इसवी सन पूर्व ५९९ मध्ये शुक्ल त्रयोदशीला ज्ञातृवंशात, क्षत्रिय कुलात वैशाली नगरीत कुंडलपूर येथे झाला.आईचे नाव माता त्रिशला वडीलांचे नाव सिद्धार्थ होते. भ.महावीर ३० वर्षाचे असतांना दीक्षा घेतली. बारा वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांना केवलज्ञान प्राप्त झाले. मानवाच्या कल्याणासाठी सम्यक दृष्टी व सम्यकज्ञान देण्यासाठी महावीरांनी भारत भर पदयात्रा सुरू केली.

    महावीरांनी जगाला शिकवण दिली. जगा आणि जगू द्या हा संदेश आहे. भुकेलेल्यांना अन्न दान. आजारी माणसाला औषध दान. अज्ञानाला ज्ञानदान. पतीतांची सेवा. मानवाला जगण्याचा अधिकार आहे तसाच पृथ्वी वरील सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. अहिंसा परमो धर्म आहे.

    अहिंसामध्ये सर्वांचे हित सामावलेले आहे.
    महात्मा गांधींनी सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसा मार्गाचा वापर केला. अडीच हजार वर्षे उलटूनही भगवान महावीरांच्या संदेशाची, शिकवणीची आजही जगाला आवश्यकता आहे.

    जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव हे आहे. त्यानंतर २३ तीर्थंकर झाले. त्यांची नावे अजितस्वामी, संभवस्वामी, अभिनंदनस्वामी, सुमतीस्वामी,पद्मप्रभु स्वामी ,सुपार्वश्व स्वामी, चंद्रनाथ स्वामी, पुष्पदंतल स्वामी,शीतल स्वामी,श्रेयांस स्वामी, वासुपुज्य स्वामी , विमलनाथ स्वामी ,अनंतनाथ स्वामी, धर्मनाथ स्वामी, शांतीनाथ स्वामी,कुंथुनाथ स्वामी, अरहनाथ स्वामी,मल्लीनाथ स्वामी,मुनीसुव्रत स्वामी,नमिनाथ स्वामी,नेमिनाथ स्वामी, पार्श्वनाथस्वामी, २४वे महावीरस्वामी तिर्थंकर.

    भगवान महावीरांचे मूळ नाव वर्धमान होते.सन्मति, श्रमण, महावीर या नावाने ओळखले जायचे. महावीर राजपुत्र होते.जगाच्या इतिहासात पहिला धर्म जैन धर्माने अहिंसा तत्वाचे वरदान दिले आहे. सर्वप्रथम जैन धर्मानेअहिंसेचा पुरस्कार केला. जगात अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. अहिंसा धर्म जगाला तारणारा आहे.भ. महावीरांनी सुमारे २६०० वर्षापूर्वीच अहिंसेचे महत्व सांगितले. माणसाला जगण्यासाठी प्राणवायू लागतो तसेच जगात सुख-शांती नांदण्यासाठी अहिंसा पालन करणे योग्य ठरेल.जैन धर्म मध्ये सर्वांत पवित्र स्थान शिखर्जी हे असुन ते झारखंड येथे आहे.या पवित्र स्थानावरुन जैन धर्मातील विस तिर्थंकर येथून मोक्षाला गेले असल्याने जैनांना खुप पवित्रस्थान आहे.प्रथम आदिनाथ तिर्थंकर कैलास पर्वतावर मोक्षाला गेले.

    तेविसावे तिर्थंकर पार्श्वनाथ स्वामी हे होते. भ.महावीरांनी दया,क्षमा, शांतीचा महान संदेशं जगाला दिला.आज सुद्धा जगाला या महान संदेशाची जरुरीची आहे.मोक्ष निर्वाण पवित्र स्थान पावापुरी बिहार येथे आहे. महावीर स्वामी दिगंबर मुनी होते.जैन दिगंबर संतमुनी वस्त्र धारण करीत नाही. श्वेतांबर जैन साधूमुनी श्वेत वस्त्र परिधान करतात.परंतू देव सर्व एकच आहे.२४ तिर्थंकरांची भगवान महावीरांची पुजा दोन्ही पंथात होते.बोलो सब मिलके जय महावीर,जय महावीर.

    संकलन:सुभाष शांताराम जैन, ठाणे.
    लेखक, कवी, पत्रकार,
    साईनाथ सोसायटी ,वर्तक नगर ठाणे,
    मो.९८२१८२१८८५
    व्हॉट्स अप ८७७९३४८२५६
    http://[email protected]

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here