लखनऊ (उपसंपादक सैय्यद गुलाम हुसेन) – सध्या देशात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून अनेक लोक आपला जीव गमवत आहे. अशातच लसीकरण देखील सुरु करण्यात आलं आहे. मात्र या कोरोनाने आता नात्यांमध्ये फुट निर्माण केली आहे. आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुलाने तिला घराबाहेर हाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
एका वृद्ध आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर तिच्या पोटच्या मुलाने तिला लेकीच्या घरा बाहेर सोडलं. लेकीच्या घरी गेल्यानंतर लेकीने आणि जावयानेदेखील पाठ फरवली आणि घराचा दरवाजा बंद केला. हातबल झालेली वृद्ध महिला अखेर रस्त्यावर राहू लागली. एक चादर पांघरुन घेऊन या माऊलीने अनेक दिवस रस्त्यावर काढले.
उपचार न मिळाल्याकारणानाने महिलेची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती. तरी देखील ना मुलगा आला ना मुलगी तिला पाहायला आले नाहीत. या महिलेचा एक व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोचला. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला लगेच रुग्णालयात नेलं. मात्र उपचारादरम्यानच माऊलीने आपला प्राण सोडला.
दरम्यान, वृद्ध महिलेची कोरोना टेस्ट पाॅझिटिव्ह आली होती. तसेच पोलिसांनी महिलेच्या मुलावर आणि मुलीवर दोघांवरही कारवाई सुरु केली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनानी परकी तर लांब आता आपल्या रक्ताची नाती देखील दुरावत असल्याचं दिसून येत आहे.






