शिरुर पोलिसांनी पकडला १६ लाख रुपये किंमतीचा ७८ किलो गांजा

पुणे (विशेष प्रतिनिधी) – न्हावरा कारखान्याचे व आलेगाव जाणारे रोडचे उत्तरेस माळरानावर पुणे पोलिसांनी छापा टाकून ७८ किलो वजनाचा किं.रू.१६,३८,000/- रूपयांचा गांजा ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी याबाबत सांगितलेली माहिती अशी की, मौजे न्हावरा गावचे हददीत साखर कारखान्याचे न्हावरा ते आलेगांव पांगा या गावाकडे जाणा-या रोडचे उत्तरेस एका झोपडीमध्ये विक्री करण्याकरीता गांजाची साठवणुक करून ठेवलेली असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने शिरूर पोलीस स्टेशनचे पोसई पडवळकर, पो.हवालदार संतोष साठे,पो.नाईक मुकंद कुडेकर, पोलीस अंमलदार इब्राहीम शेख, पोलीस अंमलदार संतोष साळुखे ,पोलीस अंमलदार प्रशांत खटेमाटे २४३९ व म.पोलीस अंमलदार शितल गवळी यांना तात्काळ बोलावून घेतले तसेच म तहसीलदार यांचेकडील नायब तहीसलदार श्री यादव व दोन शासकीय पंच यांना पोलीस स्टेशन येथे बोलावुन घेवुन त्यांना घेऊन समजलेल्या स्थळी एन.डी.पी.एस.अॅक्ट मधील छापा टाकण्याच्या तरतुदीचे तंतोतंत पालन करून सरकारी वाहन क्र.एम.एच.१२/पी.टी.२२०९ व एम.एच.४२/बी.६७२१ मधुन रवाना होवुन २०:३० वा चे सुमारास मौजे न्हावरा ता. शिरूर जि. पुणे गावचे हददीत न्हावरा कारखान्याचे व आलेगाव जाणारे रोडचे उत्तरेस माळरानावर असलेल्या एकच झोपडी दिसली .
या झोपडीला चारही बाजूंनी घेऊन आत बसलेल्या ४ इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता ०२गोणीमध्ये खाकी कागदात व प्लॅस्टिक कागदात गुंडाळलेले एकुण ३५ पुडे मिळुन आले तपासणी केली असता त्यात हिरवट रंगाचा साधारण ओलसर असा उग्र वासाचा झाड पाल्यासारखा पदार्थ दिसुन आला त्याचा वास घेवुन पाहीला असता हा गांजा असल्याची खात्री झाली. या ३५ पुड्यांचे वजन केले असता एकुण ७८ किलो वजनाचा किं.रू.१६,३८,000/- रूपयांचा गांजा मिळुन आला.
याबाबत पोलीस अंमलदार प्रशांत खुटेमाटे यांनी दिले फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे सुनिल रूपराव पवार वय २० वर्ष, आकाश सर्जेराव पवार वय २० वर्ष, विशाल कैलास मोहिते वय १८ वर्ष, प्रकाश सर्जेराव पवार वय १८ वर्ष (सर्व रा. टाकरखेड ता. चिखली जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरूध्द एन डी पी एस कायदा १९८५ चे कलम ८(क),२०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयाचा पुढील अधिक तपास डॉ अभिनव देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , मिलींद मोहिते अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग पुणे ग्रामीण, राहुल धस उपविभागीय पोलीस अधीकारी दौंड विभाग, अमृत देशमुख उपविभागीय पोलीस अधीकारी दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here