अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अजातशत्रू पत्रकार, साप्ताहिक ठाणे नागरिकचे संपादक सतीश कुमार भावे

    (सुभाष जैन)
    अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे अजातशत्रू पत्रकार, साप्ताहिक ठाणे नागरिकचे संपादक सतीश कुमार भावे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे बुलंद पोलीस टाइम्सतर्फे अभीष्टचिंतन. वाढदिवसानिमित्त त्यांचा कार्यालेख मांडणारा एक छोटासा लेख…

    सतीश कुमार भावे यांचा माझा परिचय गेल्या अनेक वर्षापासून आहे सतीश कुमार भावे यांचा जन्म 1 मे 1956 रोजी खानदेशमधील जळगाव जळगाव येथील वेदशास्त्र संपन्न, सुप्रसिद्ध ज्योतिषशाचार्य भावे गुरुजी व शांत संयमी सौजन्य मूर्ती शांताबाई भावे यांच्या पोटी जन्म झाला घरच्या गरिबीमुळे जेमतेम पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर श्री भावे यांनी काही काळ आकाशवाणीमध्ये नोकरी केली त्यानंतर त्यांनी मुंबई येथे आयकर विभागामध्ये छत्तीस वर्ष नोकरी केली

    satish-bhave-with-amitabh-bacchanनोकरी करत असताना प्रत्येक कार्याची आवड असलेल्या श्री भावे यांनी मुंबईच्या एस एन डी टी विद्यापीठातर्फे 1992 मध्ये स्वर्गीय पत्रकार तात्यासाहेब बाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या पत्रकारितेचा सायंकालीन सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला या कोर्समध्ये त्यांना भारतकुमार राऊत, निळू दामले,वि.ना. देवधर, दि.वि.गोखले यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तरीही त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते त्यांनी 1994 मध्ये सेंट झेवियर कॉलेज मधून जनजागृतीकरिता पत्रकारितेचा काही महिने कोर्स केला तेथेच त्यांना मार्ग सापडला तेथील त्यांच्या मित्रांनी त्यांना पदविका अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन केले आणि त्यांनी पार्ले येथील नरसी मोनजी कॉलेज म्हणजे एन एम कॉलेजमध्ये मराठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम सुरू असल्याचे समजतात त्यांनी तेथे प्रवेश घेतला व चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण देखील झाले

    त्याच काळात त्यांना कॉलेजतर्फे ट्रेनिंगसाठी दैनिक तरुण भारत ‌व दैनिक लोकसत्ता या दैनिकात प्रशिक्षणाकरिताsatish-bhave-with-akshaykumar पाठवण्यात आले तेथे त्यांना लोकसत्तामधील त्यावेळचे संपादक स्वर्गीय अरुण टिकेकर, प्रकाश कुलकर्णी, धनंजय कर्णिक, रवींद्र पांचाळ, अजित गोगटे, विश्वनाथ मोरे, दिनेश गुणे ,राम पवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले लोकसत्ताच्या मुशीत तयार झालेले सतीश कुमार भावे यांनी 1995 मध्ये त्यांच्या पुतणीच्या नावाने ठाणे नागरिक या वृत्तपत्राची मुहूर्त मेढ रोवली. काही दिवसांनी संपादक पदाची जबाबदारी त्यांची कन्या ज्येष्ठ कन्या रश्मी विनय कुलकर्णी यांनी सांभाळली त्यानंतर श्री भावे आयकर खात्यातून सेवानिवृत्त झाल्यावर ठाणे नागरिक जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतली

    आयकर खात्यामध्ये असताना तेथे प्रोटोकॉलचे काम करताना तेथील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी आपलेसे करून आपल्या कामाचा ठसा उमटवला एवढेच नव्हे तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते एवढेच नव्हे तर त्यांनी तीन चित्रपटांमध्येही काम केलेले आहे.पण त्याचं त्यांनी कधी भांडवल केले नाही सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांचा त्या वेळचे मुख्य आयुक्त आयुक्त श्री सक्सेना यांच्या हस्ते तसेच माधुरी दीक्षित यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात बिरला मातोश्रीमध्ये सत्कार करण्यात आला

    satish-bhave-with-sonakshi-sinhaआज बघता बघता ठाणे नागरिक आज 27 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. एक छोटेसे रोपटे वाढवण्यासाठी भावे यांनी जी मेहनत घेऊन ते नियमित पणे प्रसिद्ध करत आहे त्याला तोड नाही. प्रचंड मेहनत जिद्द कष्ट करण्याची हिंमत संकटाला धीर गंभीर पणे सामोरे जाणारे श्री भावे यांचा स्वभाव अत्यंत लाघवी मनमिळावू मनमोकळा असून ते दुसऱ्याला आपल्या मधाळ व मवाळ आणि आदर युक्त वाणीने आपलेसे करतात आणि त्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाने भारावून टाकतात त्यांच्या जागी असलेली सेवाभावी वृत्ती आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व त्यांच्या भेटीतून दिसून येते सतीश कुमार भावे यांचा आणि माझा गेल्या अनेक वर्षापासून चा घनिष्ठ परिचय असून एकदा साप्ताहिक ठाणे नागरिक मला आमच्या पेपर वाल्याच्या स्टॉलवर दिसले म्हणून मी सहज उत्सुकता म्हणून पाहिले तर सहज सर्वांग मनाला भावतील अशा बातम्या भडक बातम्या नसलेले परंतु बॅलेंसिंग बातम्या असलेले वृत्तपत्र नियमितपणे वाचावयास सुरुवात केली

    काही दिवसानंतर ठाणे नागरिकच्या कार्यालयात गेलो असता समोरच संपादक भावे यांनी माझे हसतमुखाने स्वागत केले आणि मी भारावून गेलो कारण मी ठाण्यातील अनेक वृत्तपत्रात नियमितपणे लेखन करत लेखन व छायाचित्र पाठवतोsatish-bhave-with-swapnil-joshi तेथे माझे जाणे-येणे असते तेथे स्वागत होते परंतु असे आपुलकीचे स्वागत यापूर्वी माझे कधी झाले नव्हते आपल्या लागवी बोलण्याने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने श्री भावे यांनी मला जिंकून घेतले ठाणे नागरिक वर आमची सुमारे दीड तास चर्चा झाली त्यांच्या लाघवी स्वभावामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो समोरच्या व्यक्तीची परीक्षा करताना त्यांना जास्त विचार करावा लागत नाही ते आपल्या नजरेनेच समोरच्याची परीक्षा करतात सतीश कुमार भावे हे नुसते अष्टपैलू व्यक्तिमत्व नाही तर सेवाभावी वृत्ती अखंडपणे माणुसकी जपणारे आणि जिद्दी स्वभावाचे मेहनती कामाचा कधी कंटाळा नाही दुसर्‍याचे दुःख ते आपले दुःख समजून समोरच्याच्या भल्यासाठी झटणारे श्री भावे हे नेहमी कामात व्यग्र असतात कामाचा कधीही कंटाळा नसणारे मेहनती अभ्यासू सुसंस्कृत अनुभवी तसेच मार्गदर्शक आजच्या पिढीच्या दृष्टीने त्यांचे विचार खूप मोलाचे वाटते पत्रकारिता कशी करावी हे त्यांच्यापासून शिकावं शिकण्यासारखे आहे म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सल्लागार तसेच संपर्कप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे व कोकण विभागीय अध्यक्ष श्री नितीन शिंदे साहेब यांनी त्यांच्यातील गुण पारखूनच त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे माझ्यातर्फे श्री सतीश कुमार भावे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी असेच पत्रकारिता हीच निसप्रुहपणे करत राहावी एवढीच त्यांना विनंती धन्यवाद
    (सदर लेखाचे लेखक पत्रकार, लेखक, कवी आहेत.)

    satishkumar-bhave-at-tarak-mehata-ka-ulta-chashma

     

     

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here