नाशिक (विशेष प्रतिनिधी) – सोबत काढलेला फोटा व्हायरल करण्याची धमकी देवून पाठलाग करीत एकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी धुळे जिह्यातील तरूणाविरूध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्लम उर्फ बबलु इकबाल खाटिक (१९, रा. दहिवेल, ता. साक्री) असे संशयीताचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार संशयीत बहिणीच्या दिराच्या लग्नासाठी मोरेमळा भागात आला आहे. गेल्या पाच महिन्यापासून तो घरासमोर राहणा-या अल्पवयीन पीडितेस त्रास देत आहे. मुलगी घराबाहेर पडली की तो पाठलाग करतो. तसेच तिच्या मोबाईलवर वेळोवेळी संपर्क साधतो. तसेच मुली सोबत काढलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने बोलण्यास भाग पाडून विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.







