टाकरखेडा येथील तरूण सरपंच व हाँटेल मानराजचे मालक यांची गळफास घेत आत्महत्या

मयत धीरजसिंह सिसोदिया विधमान आमदार रावळ या़चे मावसभाऊ,दोंडाईचा व टाकरखेडा गावपरिसरात शोककळा

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – टाकरखेडा ता.शिंदखेडा, जि.धुळे येथे वास्तव्यास असलेले व आजी तरूण सरपंच तसेच दोंडाईचा येथील स्टेशन भागातील हाँटेल मानराजचे मालक धीरजसिंह प्रदीपसिंह सिसोदिया(वय ३८) यांनी आज दिनांक १० मे रोजी संध्याकाळी ३.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला.

यावेळी केशकर्तनासाठी आलेल्या न्हावीने रूमचा दरवाजा उघडला असता त्यांना धीरजसिंह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले .यावेळी घरातील मंडळी लागलीच गोळा झाली. तेथे उपस्थित असलेले त्यांचे मोठे भाऊ व इतर नातलग यांनी त्यांना दोंडाईचा येथील निर्मल हाँस्पीटलमध्ये आणले.मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली होती. त्यानंतर त्यांना उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला मुत्यूचे कारण समजू शकले नाही. म्हणून अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मयत धीरजसिंह सिसोदिया हे दोंडाईचा येथील माजी मंत्री व शिंदखेडा मतदार संघाचे विधमान आमदार श्री जयकुमारभाऊ रावळ यांचे मावसभाऊ होते.यावेळी उपजिल्हा रूग्णालयात आमदार जयकुमारभाऊ रावळ, न.पा.बाधकाम सभापती निखील राजपूत, आरोग्य सभापती कुष्णा नगराळे, नगरसेवक हितेंद्र महाले,भरतरी ठाकुर, संजय तावडे, नरेंद्र गिरासे, न.पा.इंजिनिअर शिवनंदन राजपूत, जगदीश पाटील, मनोज सोनवणे,बंटी भाऊसाहेब, संजय अग्रवाल, राकेश अग्रवाल, पंकज चौधरी यासह तावखेडा व दोंडाईचा येथील रावळ व सिसोदिया परिवारावर प्रेम करणारी बरीचशी मंडळी उपस्थित होती.

मयत धीरजसिंह सिसोदिया यांच्या मागे आई,पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, भाऊ,मावसभाऊ श्री जयकुमारभाऊ रावल,मामा जिल्हा परिषद सदस्य मुन्ना रावल यासह मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here