दोंडाईचात आणखी तीन लसीकरण केन्द्र सुरू करण्याची परवानगी द्यावी – लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवताई रावल

कोरोना प्रतिबंधक लसीचा वाढीव पुरवठा करणे व अतिरिक्त वाढीव लसीकरण केंद्र सुरू करण्याची आ.जयकुमारभाऊ रावल यांची मागणी

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – शहरातील दादासाहेब रावल स्टेडियम येथे सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र हे गेल्या तीन दिवसापासून बंद असल्याने शहर व परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा जास्तीचा पुरवठा करण्यात यावा तसेच गावभाग परिसर मोठा असल्याने गावातील इतर मोठ्या प्रभाग एरियात तीन ते चार ठिकाणी अतिरिक्त वाढीव लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे. जेणे करून लस घेण्यासाठी येणाऱ्या जनतेची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही आणि गैरसोय देखील होणार नाही. म्हणून शहराची लोकसंख्या पाहता लवकरात लवकर वाढीव लस कोटा व लसीकरण केन्द्र सुरू करावे, अशी मागणी शिंदखेडा मतदार संघाचे विधमान आमदार व माजी मंत्री जयकुमारभाऊ रावल व लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल यांनी त्यांच्या प्रसिद्ध पत्रकावर मा.जिल्हाधिकारी, धुळे व मा.शल्य चिकित्सक धुळे यांच्याकडे आज दिनांक ११ मे मंगळवार रोजी केली आहे.

याबाबत मा. जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी मा.उपजिल्हाधिकारी (प्रशासन) हेमांगी पाटील मॅडम व जिल्हाचिकीत्सक सो.धुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दोंडाईचा शहराची लोकसंख्या जवळपास सतंर हजाराच्या आसपास आहे. त्यात फक्त शासन नियमानुसार दादासाहेब रावल स्टेडियम येथे जेमतेम एक लसीकरण केन्द्र सुरू आहे. सुरूवातीला येथे वयवर्ष ४५ वरील जनतेला लसीकरणाचा डोस नियमानुसार, कोणताही शारीरिक त्रास न होऊ देता, अल्प वेळात लावण्यात येत होता.मात्र नवीन शासन निर्णयानुसार वयवर्ष ४५ वरील जनतेला लसीकरण तुर्तास बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्याच ठिकाणी वयवर्ष १८ ते ४४ मधील जनतेला विनामुल्य लसीकरण करण्याचे सरकारतर्फे घोषीत करण्यात आले. तेव्हापासुन येथे आँनलाईन नावनोंदणी केलेल्या जनतेला लसीकरण केले जात आहे. मात्र अनेकवेळेला आँनलाईन नोदंणी जास्त व लसीकरण डोस कमी ,त्यामुळे अनेकदा शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी नंबरवर असलेल्या नागरिकांसोबत वादविवाद पाहावयास मिळतात. तसेच आता शासनाने वयवर्ष ४५ वरील व्यक्तींचे देखील डोस उपलब्ध केल्याने ते वयस्कर व्यक्ती देखील आधार कार्ड, आँनलाईन नोदंणी घेऊन सदर सुरू असलेल्या एकच केन्द्रावर धडकतात.

त्यामुळे तेथे गर्दीचे व १८ ते ४४ वयवर्ष लोकांमध्ये नंबर लावण्यावरून वादविवाद होऊन कोवीळ-१९ चे नियमही पाळले जात नाही. त्यामुळे त्याच्यांवर कार्यवाही करावी का? सोडून द्यावे असा प्रश्न ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीसापुढे पडतो. म्हणून त्यांना कितीही समजावले पण दैनंदिन गर्दी केन्द्रावर पाहावयास मिळते.त्यामुळे करोना आजार कमी होण्याऐवजी वाढूही शकतो.म्हणून आपण वरील सर्व परिस्थितीचा अभ्यास करून गाव व परिसरातील जनतेसाठी वाढीव लसींचा साठा पाठवावा व गावात आणखी तीन ते चार ठिकाणी लसीकरण केन्द्र लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी शिदंखेडा मतदार संघाचे आमदार जयकुमारभाऊ रावल व दोंडाईचा नगरपालीकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुवरताई रावल यांनी सह्या करून पक्षाच्या प्रसिद्ध पत्रकावर केली आहे. यावेळी प्रत्यक्ष निवेदन देताना दोंडाईचा नगरपालीकेचेआरोग्य सभापती प्रतिनिधी कृष्णा नगराळे, नगरसेवक संजय तावडे, भाजपा पदाधिकारी पंकज चौधरी, छोटू ढोले, भाजपा शहर चिटणीस मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here