दोंडाईचा पोलिसांनी लावला चार महिन्यात, सात लाख रूपये चोरीचा छडा

बाम्हणे गावात घरातून चोरलेल्या पैशातून आरोपीने घेतले सोने-चांदी व मोटरसायकल

दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – बाम्हणे (ता. शिंदखेडा जि.धुळे) ह्या गावी दिनांक १५/०१/२०२१ संध्याकाळी सहा वाजेनंतर बंद घरातुन अज्ञात चोराने सोन्या-चांदीचे दागिण्यासह रोख रक्कम सात लाख दोन हजार एकशे सत्त्यांतर रुपयांचा माल चोरून नेला होता. ह्या घटनेला जवळपास चार महिने झाल्यानंतर दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना गुप्त खबऱ्यामार्फत टीप मिळाली की,बाम्हणे येथील चोरीतील आरोपी हा शिंदखेडा येथील पवन कोमलसिंग गिरासे हा असून तिवारी साहेबांनी पोलीसांची टीम बनवून,सापळा रचत त्याला शिंदखेडा येथुन ताब्यात घेण्यात आले व त्याच्याकडून सोने-चादींचा मुद्देमाल हस्तगत करत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यामुळे बाम्हणे गावातुन पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

याबाबत दोंडाईचा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक १५/०१/२०२१ रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपासुन ते दिनांक १६/०१/२०२१ रोजी दुपारी ११.०० वाजेच्या दरम्यान बाम्हणे गावात राहणारे गुलाब आत्माराम सोनवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकुण सात लाख दोन हजार एकशे सत्त्यांतर (०७०२१७७/) रूपये किमंतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत गुलाब सोनवणे यांनी दोंडाईचा पोलीसात फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार महिन्यांपासुन सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष लोले करत आहेत.

मात्र सदर तपास कामात काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना गुप्त खबऱ्यामार्फत टीप मिळाली की, बाम्हणे गावात शिंदखेडा येथील पवन कोमलसिंग गिरासे याने चोरी केली आहे.आरोपी पवन याचा छडा लागताच तिवारी यांनी टीम बनवत,सापडा रचून दिनांक १०/०५/२०२१ अटक करण्यात आली असुन न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली आहे. यावेळेस त्याला विश्वासात घेऊन खालील मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

एक दहा तोळे सोन्याचा अखंड तुकडा, एक ५०० ग्राम वजनाचा चांदीचा अखंड तुकडा, ११ ग्राम वजनाच्या सोन्याच्या कानसाखळ्या दोन, एक सोन्याचे मंगळसुत्र, २२ ग्राम वजनाचे चांदीचे पायाच्या बोटातील जोडवे, ८६ ग्राम वजनाचे एक चांदीचा जुना दागिना, ५० ग्राम वजनाचा एक चांदीचा सिक्का,त्यावर सी.आर.पाटील असे नाव व शिक्का बीएसएनएल असलेले, तसेच चांदीच्या लक्ष्मीचे शिक्के ०९ नग,दोन चांदीच्या लक्ष्मी मुर्त्या, एक सोन्याचे ओम पान, कानातील दोन सोन्याच्या बाळ्या, सोन्याची मणी व कानातील पुळकी व एक हिरोहोंडा कंपनीची विना नंबरची मोटरसायकल असा एकूण सहा लाख दोन हजार आठशे (०६०२८००/) रुपयांचा मुद्देमाल व २५०००/ रूपये किंमतीची जुनी मोटरसायकल असा एकूण सहा लाख सत्तावीस हजार आठशे रुपयांचा (०६२७८००/) माल आरोपी नामे पवन कोमलसिंग गिरासे,राहणार रथगल्ली,शिंदखेडा याने काढून दिला आहे.

सदर गुह्यांचा तपास पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांनी दिलेल्या सुचनेवरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या आदेशान्वये सहा. पोलीस निरीक्षक संतोष टी.लोले,पोलीस उपनिरीक्षक देविदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचीन गायकवाड, पोलीस नाईक मुकेश आहिरे, योगेश पाटील, राजेंद्र सोनवणे आदी करत असुन उर्वरित आरोपींच्या मागावरही पोलीस आहेत, असे शेवटी तिवारी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here