धनाजी नाना महाविद्यालयात सूर्यनमस्कार कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न झाले

यावल (तालुका प्रतिनिधी डॉ. मोहन साळुंके) – फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या व आय. क्यु. ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या कालावधीत सूर्यनमस्काराचे महत्त्व या विषयावर सहा दिवस चालणाऱ्या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. उदय जगताप, जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. सतिश चौधरी आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे आदी प्रमुख उपस्थितीत होते. कार्यशाळेस एकुण 153 जनाणी नोंदणी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सतीश चौधरी, सुत्र संचालन डॉ. गोविंद मारतळे व अभार प्रा. शिवाजी मगर यांनी मानले.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी आणि उद्घाटक म्हणून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांनी विद्यमान आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी कोरोना कालावधीत स्वतःची पर्वा न करता ते समाजासाठी दिवस रात्र परिश्रम घेत आहेत. परिश्रम घेण्याची सवय ही त्यांना त्यांच्या घरातूनच मिळालेली आहे असे सांगितले. त्या प्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी सर यांनी स्व. धनाजी नाना चौधरी आणि स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या समाज कार्याची आठवण करुन दिली. ज्या प्रमाणे स्व. धनाजी नाना व स्व. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांनी पूर्ण आयुष्य समाज सेवेसाठी झिजवले तेच वारसा आता श्री. शिरीषदादा मधुकरराव चौधरी चालवत आहेत. कोरोना सारख्या महामारीत समाजील व्यक्तीचे आरोग्य सुधारण्याची तळमळ पाहुन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे सांगितले.

webinar-at-dhanaji-nana-college

महाविद्यालयाचा क्रीडा विभाग हा संपुर्ण विद्यापीठ परिक्षेत्रात नावलौकिक प्राप्त असा विभाग आहे हे सांगितले. विविध राज्य, राष्ट्रीय आणि अखिल भारतीय अंतर विद्यापीठ स्पर्धेत विविध खेळात पदक देणारे महाविद्यालय आमचे आहे त्याबद्दल आम्हला अभिमान आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. सतीश चौधरी यांनी कोरोना सारख्या महामारीत रोग प्रतिकार शक्तीचे महत्व आणि ती रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार ची उपयोगिता या विषयी सांगितले. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. उदय जगताप यांनी महाविद्यालयात समाजाच्या विकासात्मक आणि उन्नती साठी विविध कार्यक्रम चालविले जातात त्याबद्दल सांगितले.

डॉ. मारतळे यांनी पुढील सहा दिवस सूर्यनमस्कार कार्यशाळेत सूर्यनमस्काराचे महत्त्व, बिज अक्षर व सूर्याच्या नाम उच्चरनाचे महत्त्व, विविध आसन व त्याचे महत्त्व या बद्दल येणाऱ्या सहा दिवसात शिकविण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यशाळेस प्रशिक्षक म्हणून महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे हे उपस्थितीत राहणार आहेत. डॉ. मारतळे यांनी संस्थेत चे अध्यक्ष व विद्यमान आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी आणि संपुर्ण व्यवस्थापन मंडळ व प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी यांचे आभार मानले. कारण क्रीडा विभागाची प्रगती ही संस्थेने दिलेले स्वातंत्र्य आणि क्रीडा विभागावर दाखविलेल्या विश्वासामुळे व सहकार्यामुळे आहे सांगून पुनश्च एकदा सर्वांचे अभार व्यक्त करुन पुढील सहा दिवस दिनांक 10 मे, 2021 ते 15 मे 2021 पर्यंत चालणाऱ्या कार्यशाळेस सर्वांनीच उपस्थित राहावे अशी विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here