भाजपा खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याची मागणी भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी केली होती. अटकेच्या मागणीसाठी तडस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं पालन करण्यात न आल्याचं निदर्शनास आलं असून, याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निगरानी पथकाने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात खासदार रामदास तडस आणि आयोजक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधिकारी धनाजी जळक यांनी ही माहिती दिली.

“आमदार कांबळे यांनी यापूर्वीही अनेक अधिकाऱ्यांना धमकावलं आहे. परंतु एकाही अधिकाऱ्याने तक्रार न केल्यानं कांबळेंची हिंमत वाढली. अनेक अधिकारी विनंतीवर बदली करून घेत जिल्हा सोडून गेले. मात्र, डॉ. डवले यांनी हिंमत दाखवून पोलीस तक्रार केली. या तक्रारीची तत्काळ दखल न घेतल्यास आरोग्य यंत्रणा नाराज होऊ शकते. याचा विपरित परिणाम लोकांच्या आरोग्यावर झाल्यास कांबळे हेच जबाबदार असतील. त्यामुळे कांबळे यांना अटक करावी,” अशी मागणी तडस यांनी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here