- शहर व परिसरातील पन्नास परिचारिकांचा सत्कार
- याप्रसंगी मान्यवरांकडून परिचारिकांना पन्नास टिफिन बॉक्सचे वाटप
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – येथील रोटरी नागरी सहकारी पतसंस्था व रोटरी क्लब ऑफ सिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील विविध कोवीड सेंटर व शासकीय रूग्णालयात सेवा देणाऱ्या पन्नास परिचारिकांचा जागतिक परिचारिका -डे निमित्त सत्कार करत प्रोत्साहनपर टिफीन बाँक्सची भेट देण्यात आली.
जागतिक परिचारिका-डे निमित्त दोंडाईचा शहरात कामगार भवनात सुरु असलेले कोविड केअर सेंटर, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय व निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथील सर्व परिचारिका भगिनी कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व त्यांना प्रत्येकी एक हया पद्धतीने पन्नास टिफिनचे वाटप करण्यात आले.
देशात हाहाकार माजवलेल्या करोना परिस्थितीत ह्या छोटेखानी राबविल्या गेलेल्या कार्यक्रमात रोटरी संस्थेचे संचालक संजय छाजेड म्हणाले कि , मागील गेल्या एक वर्षांपासून कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी असून स्वतःचा जीव धोक्यात ठेवत परिवाराची काळजी घेत,रूग्ण सेवा, कामगिरी अत्यंत इमानेइतबारे बजावत असून अभिनंदनास पात्र असल्याचे सांगितले. तसेच रोटरी क्लब आँफ दोंडाईचा सिनीअर्स तर्फे ॲड नितीन अयाचित यांनी मनोगत व्यक्त केले की, परीचारीका भगिनींचे कौतुक करावे. तेवढे कमी आहे. डॉक्टर पेक्षा हे लोकच रूग्णाची मनापासून देखभाल करत,प्रत्यक्ष त्यांच्याजवळ जात,त्यांचे दुखणे समजुन घेत,त्यांना दिलासादायक धीर देत,जीवन जगण्याची ओढ निर्माण करत,सकारात्मक दुष्ट्रीकोन त्यांच्यात निर्माण करत आहे. म्हणून अशा ह्या कठीण परिस्थितीत आरोग्य विभागात सेवा देणाऱ्या परिचारिका माता-भगिनींंच्या कार्याला सलाम, असे शेवटी सांगितले.छोटेखानी कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहनपर म्हणून टिफिन बॉक्स यावेळी भेट देण्यात आले.
यावेळी डॉ हितेंद्र देशमुख, डॉ. युतिका भामरे, रो. संजय छाजेड रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन सिसोदिया, पतसंस्थेचे अध्यक्ष रो. श्री सुरेशजी जैन, रो.अमन जयस्वाल, रो. ॲड नितीन अयाचित , आरोग्य सभापती श्री जितेंद्र गिरासे सर व परिचारिका कर्मचारी बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .



