चार जणांवर सरकारी कामात अडथळा व इतर गुन्हे दाखल
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – दाऊळ ता. शिंदखेडा शिवाराती अमरावती नदी पात्रातमध्ये, स्मशानभूमी लगत काही जण अवैधपणे मुरूम उपसा करीत असल्याची गुप्त माहिती अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांना मिळाली. यावेळी त्यांनी आलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत ,सहकाऱ्यासह दाऊळ शिवारात मोर्चा वळवला.
याठिकाणी अवैधपणे मुरूम उपसा करताना आढळून आल्याने सुदाम महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी टँक्टर चालक व जेसीबीवाल्याला हटकले. तसेच कार्यवाही करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्याचा राग येऊन जेसीबी व ट्रॅक्टर मालकाकडून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांना धक्काबुक्की,दादागिरी करत , मोठ्या आवाजात धमक्या देत अंगावर चालून आले. तरी अशा दहशतवादी वातावरण मोडीत काढत तहसीलदार सुदाम महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांनी टँक्टर व जेसीबी तहसील आवारात आणले व आज दिनांक,१२ मे रोजी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जेसीबी मालक व ट्रॅक्टरच्या तीन जण व इतर तीन ते चार जणांच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यात धक्काबुक्की करणारे संशयित आरोपी हरपाल भोजुसिंग गिरासे, वय ३३ वर्षे रा. वणी ता. शिंदखेडा, जेसीबी मालक अलंकार अशोक भामरे वय ५० वर्षे रा. दाऊळ ता. शिंदखेडा, राजेंद्र जामसिंग गिरासे, रा. वणी ता. शिंदखेडा, जेसीबी चालकाचे नाव माहिती नाही, व दोन्ही ट्रॅक्टर चालक व ईतर अनोळखी तीन चार ईसम नाव गाव माहिती नाही. इत्यादी इसमांविरुद्ध दोंडाईचा पोलीस ठाण्यात ३५३,३३२,३४१,३७९,१४३,१४७,३२३,५०४,५०६,३४,१८८,२६९,२७० महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ प्रमाणे, ३७ १.३. चे उल्लंघन, साथ रोग कायदा प्रमाणे दोंडाईचा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



