गावातीलच सामाजिक कार्यकर्त्याच्या डॉक्टर पतीसह तीन जणांवर दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल
दोंडाईचा (विशेष प्रतिनिधी) – टाकरखेडा ता.शिंदखेडा जि. धुळे. येथील तरूण सरपंच व दोंडाईचा येथील हाँटेल मानराजचे मालक धीरजसिंह प्रदीपसिंह सिसोदिया यांनी दिनांक १० मे रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती.मात्र त्या आत्महत्या बाबत गावात कुजबुज सुरू होती.म्हणून त्या घटनेने वळण घेत आज गावातील चार जणांवर आत्महत्येस प्रवुत्त केल्याप्रकरणी मयतचा मोठा भाऊ शैलेन्द्रसिंह प्रदीपसिंह सिसोदिया यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत शैलेन्द्रसिंह प्रदीपसिंह सिसोदिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मी टाकरखेडा गावी आई,पत्नी, लहान भाऊ कै.धीरजसिंह व त्यांच्या पत्नी, मुलांसह एकत्र कुटुंबात राहतो.तसेच मी गावातील संरपच पद देखील भुषवले आहे. तेव्हा सर्व काम माझा भाऊ धीरजसिंह हाच काम पाहत होता. आताही तो पदावर असताना जाणूनबुजून गावातील अनिताबाई नरेंद्र गिरासे,नरेंद्र दलपतसिंह गिरासे, बन्सीलाल दलपतसिंह गिरासे, सागर लक्ष्मण गिरासे आदी जण खोट्या नाट्या तक्रारी करत असत.
यापूर्वी मागेही 2००८ मध्ये त्यांनी ग्रामसभेत खोटेनाटे आरोप करून, ग्रामसभा तहकूब करत भावाला मारहाण केली होती व आताही गावातील विकास कामांच्या अनेक खोट्या तक्रारी वरपर्यंत करून,चौकशी लावून, गावात भाऊची बदनामी करत फिरत असे.ह्या सर्व नेहमीच्या जाचाला कंटाळून माझा भाऊ धीरजसिंह सिसोदिया याने दिनांक १० मे रोजी संध्याकाळी ३.३० वाजेच्या सुमारास घरात साडीचा गळफास जीव सोडला. म्हणून माझी वरील चार जणांविरोधात माझा तरूण भाऊ धीरजसिंह प्रदीपसिंह सिसोदिया यास आत्महत्येस प्रवुत केल्या प्रकरणी तक्रार आहे अशी फिर्याद लिहून दिलेली आहे. रात्री उशीरापर्यंत एकाही आरोपीस अटक करण्यात आलेली नव्हती.



